STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

4  

Sarika Jinturkar

Others

राग

राग

1 min
734

 एक संवेदना मनातील 

स्वतःचा किंवा आपल्यामुळे समोरच्याचा 

अपेक्षाभंग झाल्यावर "राग" येणे आहे स्वाभाविक  


मात्र...

 बालपणी राग फार 

वेळ नाही टिकायचा 

 थोडा रुसवा फुगवा अन् 

फक्त तो नाकावर असायचा


कधी घराच्या कोपरयात जाऊन बसायचा 

सकाळी काय झाले बरे, रात्रीत विसरायचा 


बालपणी राग कधी मन नाही दुखवायचा 

संताप त्याच्या बरोबरीने कधीतरीच फिरकायचा 


खोट्या कट्टी बट्टीत अलगदपणेे तो विरघळायचा

अहंकार त्याच्या सोबतीला कधी नसायचा 

ताईच्या लाडिक बोलण्याने न सांगता तो पळायचा 

बाबांच्या आवाजाला घाबरायचा

पण... 

 राग झाला आहे आता खेळ भावनांचा 

आता मात्र शांत होता होता 

तळ गाठतो तो मनाचा 


दोन अक्षरी शब्द पण किती काही करून जातो

 परिस्थितीला सामोरे जाऊन 

स्वतःचे नियंत्रण सोडून जातो 

राग झाला आता वेगळ्या रंगाचा 

मिसळला त्यात रंग मान- अपमानाचा 


 स्नेही व्यक्तीमध्ये अबोला आणतो

 गैरसमजेचा साथी बनतो,   

 चूक लक्षात आल्यास पश्चातापास भाग ही पाडतो 

म्हणूनच ...

राग आल्यावर थोडं थांबावं

 चूक झाल्यावर थोडं नमावं 

 आपल जगणं सरळ सोपं करावं...


Rate this content
Log in