राधाराणी
राधाराणी
राधाराणी जेव्हा जेव्हा मी होते उदास मन म्हणते मनापासून हास
तूपण आहेस तुझ्या कृष्णाची खास ऐक राधाराणी तुझ्या डोळ्यात का गं पाणी
बघ जरा मागे फिरुनी आला कृष्ण बासुरी घेवूनी
ऐकुनी गोड सुरेल धून राधाराणी गेली रंगून
पाहून तिचे व्याकुळ मन कान्हा गेला भान विसरून
प्रेमरंगात गेला दिवस सरून राधेचा आला कंठ भरून
प्रतीक्षेत कशी रात्र जाईन एकच ध्यास बसली
घेऊन कृष्ण सांगे समजावून हळूच घेतले जवळी ओढुन
होतीस दिवसा माझ्या जवळी रात्री तर मी स्वप्नात येईन
नको अशी तू उदास होऊ सांग कोणते मी गीत गाऊ?
तू तर माझी प्राणसखी तुझ्याशिवाय मी कसा राहू?
राधाराणी गोड लाजली गोपींबरोबर खेळू लागली
कोणी का नाही दृष्ट काढली खऱ्या प्रेमाला नजर लागली
