राधा
राधा
1 min
485
श्रावण घन घन निळ मन
झाली बावरी राधा तनमन
कालिंदीच्या कृष्ण लहरीनि
अवचित आले मेघ गगनी
धीर सुटला त्या मेघातून
बरसत गरजत आला सावन
केकावली त्या शत मोरांच्या
उमले पिसारा सहस्त्र पंखांचा
सुर घूमला मल्हारचा
वेणु वाजे त्या वृन्दावन
गोप गोपिका जमल्या किनारी
राधा राधा हाक बावरी
वाजे कृष्णा ची मधुर बासरी
जागे झाले ते नंदनवन
ठुमकत ठुमकत आली राधा
झाली तिला कृष्ण बाधा
कृष्णा कृष्णा साद घालता
भीजले सारे सारे गोधन
श्रावण घन घन निळ मन
