राधा
राधा
1 min
245
परतुनी ये तू त्या वृंदावनी
ये तु सोबत राधा घेऊनी
निल रंगातुनी अलगद यावे
सोन कवडसा पुलकित व्हावे
सुगन्ध यावा जसा केतकीतून
ये तू सोबत राधा घेऊन
कदंब वृक्ष तरु तिरीतून
ऐकू येई साद आंबरातून
लता वल्ली पल्लव चामरातून
ये तू सोबत
नट नागर तू नट गिरीधार
मिरेचा तु मित्र कलंदर
विष प्राशन का ? तिच्या प्राक्तनि
ये तू सोबत राधा घेऊनी
