STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Others

4  

Bhagyashri Chavan Patil

Others

Quarantine

Quarantine

1 min
119

Quarantine मुळे का असेना 

लोकं आपल्या घराकडे निघाली..


तर कधी कोणाचं रंगाकडे लक्ष गेलं

तर पाऊले परत जुन्या दिवासाकडे वळाली..


Quarantine मुळे का होईना गायब 

झालेली पाखरं परत पहिल्या सारखी दिसू लागली..


तर कधी कोणाचं लक्ष त्या कोपऱ्यात 

बसलेल्या ब्याट बॉल कडे आणि मुले ही खेळू लागली..


Quarantine मुळे का होईना माणसे 

गेलेल्या त्या वेळेत रमु लागली..


काही काळासाठी का होईना भ्रमण यंत्र 

सोडुन आपापल्या परीने स्वतः मध्ये रमली..


Quarantine मुळे का होईना काहींचे लक्ष

किचन कडे ही वळु लागले..


वेळ काय जाता जाईना म्हणून कोणी

जिभेचे चोचले पुरवू लागले...


Quarantine मुळे का होईना 

इडियट बॉक्स ही शहाणा होऊ लागला..


त्याच बॉस्क ने लहानपणीचे दिवस ही परत 

आणले प्रत्येक जण आठवणी हसवून हसु लागला..


Quarantine मुळे का होईना माणसांना 

घराची किंमत कळाली..


जिथे आपण राहतो तेच घर सुरक्षित आहे

याची आता सगळ्यांना खात्री पटली...


Quarantine मुळे का होईना माणसे

आता आपल्याला घरीच थांबली...


घरचा वेळ हिच खरी संपत्ती 

याची खात्री सगळ्यांना पटली..


Rate this content
Log in