पुस्तकांगण....!
पुस्तकांगण....!
1 min
171
विचारांचे ते परीस
पुस्तक माझे
शब्दांचे कणीस
पुस्तक माझे....!
लेखणीचा सागर
पुस्तक माझे
भावनांचा उद्रेक
पुस्तक माझे...!
इतिहासाची जाण
पुस्तक माझे
बुद्धीची खाण
पुस्तक माझे....!
भाषेची लज्जत
पुस्तक माझे
बालपणीचा ठेवा
पुस्तक माझे....!
ज्ञानाची पर्वणी
पुस्तक माझे
ह्रदयास दिलासा
पुस्तक माझे....!
पुस्तकांगण दिसे
भोवताली
न सरता सरत नाही
न उरता उरत नाही....!
