पुस्तक
पुस्तक
1 min
362
हातातील पुस्ताकाला
प्रेम तिचे सांगत होती
पडद्याआड लपलेल्या
वेदना ती मांडत होती....
मावळत्या सांजवेळी
हे मन वेडे झाले होते
सुखद क्षणांना जणू
हृदयात साठवत होते....
गंधाळल्या सांजेला
जणू कवटाळले होते
अंबरातल्या नजरेने
भावमनी गुंफले होते.....
सुखवर्णी पालवीचे
रान हिरवे झाले होते
श्वासातल्या शब्दांना
ओठांवर आणले होते.....
ओठांवरील प्रत्येक
शब्द ती वाचत होती
भिरभिरणारी नजर
शब्दफुले वेचत होती....
