STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

पुस्तक आयुष्याचे

पुस्तक आयुष्याचे

1 min
316

पुस्तक आयुष्याचे


पुस्तक आयुष्याचे

उघडावे हळुवार

शोधावे निसटलेल 

क्षण तेच वारंवार


कधी कुठे चुकले

शोध त्यात घ्यावा

चुकातून शिकलेला

नवा बोध तो दयावा


सगे सोयरे आप्तगण

असावे प्रत्येकासाठी पान

चाळतांना पानोपानी

वाटावा स्वतःस अभिमान


स्वप्नांची रंगीत चित्रे

आनंदाची ती असावीत

दुःख जरी आली तरी

रंग अबाधीत राहावीत


नित्य नवे जगतांना

स्वतःच पाने पलटावी

अखेर होताना ती

दुसऱ्या हाती सोपवावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन