पुरुषाला ही भावना असतात
पुरुषाला ही भावना असतात
पुरुषाचे प्रेम अव्यक्त असते त्याला कृतीची जोड असते
त्याच्या ही मनात गुढ काही लपलेल असत
त्याला ही भावना असतात कधीतरी त्याला ही वेदना होतात
आई आणि बायकोच्या कात्रीत सापडलेला पुरुष
सहनशीलतेच एक ऊदाहरण असत
आपल्या कुटुंबा साठी तो आयुष्य भर लढतो
कधी जिंकतो तर कधी हारतो
झालेल्या जखमा लपवून कुटुंबा समोर हसतो
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून मनातच कुढतो
तो एक पुरुष सर्वांचा आधार बनतो
स्वतःला मात्र निराधार समजतो
त्याला मन मोकळे करून कधी रडता ही आले नाही
त्याच्या भावना त्याच्या वेदना कोणी समजु शकले नाही
पुरुष होणे सोपे नाही त्यांच्या शिवाय जगने ही परीपूर्ण
नाही
