पुन्हा टाळेबंदी
पुन्हा टाळेबंदी
1 min
233
पुन्हा-पुन्हा टाळेबंदी
पुरते कंंटाळले आहेत
तुझ्यापुुुुढे कोरोना सारे
हतबल झाले आहेत
ना ईलाज ना औषधी
जगाव तरी कसं
पोटाची खळगी भरण्या
घरात बसाव तरी कसं
होतं नव्हत ते सारे
घरातील संपले आहे
येथील गोरगरीब जनता
कासावीस झाली आहे
कित्येक दिवसांपासून
घरात बसून आहेत
बायको लेेेकरे घरी
रोजचं रडत आहेत
कोरोना तुझ्या जाण्यांन
सुखाने जगणार आहेत
नाहीतर तुझ्याने थोडे
उपाशी जास्त मरणार आहेत
