STORYMIRROR

Sayli Kamble

Others

3  

Sayli Kamble

Others

पुन्हा तोच पाऊस

पुन्हा तोच पाऊस

1 min
253

पुन्हा तोच पाऊस आज नव्याने पडतोय

मातीचा दरवळणारा सुगंध परत बालपणात नेतोय


दाटून येतात ढग नभात अन आठवणी मनात

तो बरसतो आणि भिजवून टाकतो प्रत्येक मन एका क्षणात


चिंब भिजावे, स्वत:लाही विसरून

पुन्हा लहान व्हावे,हिच संधी साधून


पण आता नाही भिजता येत तितक्या प्रामाणिकपणाने

डबक्यात नाही खेळता येत पडण्याच्या भितीने


पुर्वी लहान उडी हि घेतली जाई अगदी उत्साहाने

आता मात्र मंदावली झेप, पंख मोठे झाल्याने


आपणच मोठे झालोत, अपेक्षांच्या ओझ्याने

पुन्हा तोच पाऊस,आजही पडतोय नव्याने


Rate this content
Log in