पुन्हा एकदा
पुन्हा एकदा
1 min
159
हादरला देश पुरता
केली तिची रे होळी.
पुन्हा एकदा नराधमांनी
कुस्करली रे एक कळी.
घातला घाव नशिबाने
खेळली कशी रे खेळी.
नाजुक स्वप्निल माझ्या 'मनी'चा
का घेतला रे तुम्ही बळी.
पोटा पुरता पसा पाहिजे
नको पिकाया पोळी
माणुसकीच्या डोही असते
सदा आब्रू ची मोळी
लेक माझी लाडाची ती
जशी अप्सरा ती चंद्रकळी
गरिबाच्या घरी जन्मली
तेच दुर्दैव काय ते भाळी
आता नको मज दान सांत्वनांचे
नको मज कुठली थाळी.
*देणाऱ्याचे हात हजारो*
*दुबळी माझी झोळी*
