पुन्हा आज..
पुन्हा आज..
1 min
152
पुन्हा आज हवेत पसरला मंदधुंद गारवा
झाली हवा पावसाळी
पुन्हा शब्द झाला नवा पावसाळी
मने पोळणारी आता चिंब भिजली
व्यथेला मिळाली दवा पावसाळी
जुनी आठवण मनाला हळवी करे
तिचा आठवे गोडवा पावसाळी
सुगंधात न्हाले कसे श्वास माझे
कसा धुंदला हा गारवा पावसाळी
मला आवरून मी कसे सांग आता,
उडे मनात भावनांचा थवा पावसाळी...
