पुलवामा हल्ला
पुलवामा हल्ला
हुतात्मे वर्णिले मनी
ओळखुनी त्या क्षणी
मृत्यू कडेकोट दारी
काही क्षणात निजवी!!धृ!!
कित्येकवर्ष नव्हे ते
दोन क्षणात संपले
मायभूमी रक्षणार्थ
प्राणार्पण त्यांनी केले!!१!!
काय होते दोष त्यांचे
भ्याड हल्ल्यात मारले
एक दोन नव्हे तर
बेचाळीस ठार केले!!२!!
हे बरोबर चूक की
ते उघडकीस आले
पुरावे त्यांच्या विरुद्ध
असूनही नकार दिले!!३!!
आम्ही नव्हे दुसरेच
बोलत वंचित केले
वर्षानुवर्ष देशात
अतिरेक्यांना पोसले!!४!!
कुंकुवाचा धनी तिचा
पोर तिच्या पदरात
गर्वाने सांगते माय
माझं सर्वस्व सैन्यात!!५!!
वेळ ही समीप आता
मिटवू ह्या पाकड्याना
वाटे मला तोच वार
त्यांच्यावर भेदण्याचा
त्यांच्यावर भेदण्याचा!!६!!
