पटलं मला
पटलं मला
1 min
175
आई.. तू म्हणते ते पटलं आता मला
चार चांगली पुस्तकं वाचुन काढा
कशाला सारखा फुटक्या नशीबाचा पाढा आपणच आपले शिकत जातो मग
येईल त्या परिस्थितीत धरतो तग
तु म्हणते ते पटल आता मला ...
लवकर निजे लवकर उठे
तो मंत्र दिलाय तु मला
कशाला हवी ग जिम वगैरे
घरातले कामच पुरतील सारे
वजनवाढीचे बंद होतात नारे
नकोच खायला उगाच बाहेरच
घरातलच सगळं शिजवून खायच
कधीच नाही मग आजारी पङायच
आहे त्या परिस्थितीत
स्वतःवरती विश्वास ठेवत
आपण मस्त आनंदात जगायचं.
आई तू म्हणते ते पटलं आता मला...
