पत्नी
पत्नी
मुलगी म्हणून वाढते लाडाने माहेरी
संस्काराची जपते जी शिदोरी
बालपणी भातकुलीच्या खेळात संसार मांडणारी
जेव्हा नव्याने संसार थाटते
आपल्या जोडीदाराला सर्वस्व मानते
माप ओलांडून येते जी लक्ष्मी म्हणून
त्या घरची होते तिचे घर सोडून
ती पत्नी असते....
प्रेमाने वागते सर्वांशी, सर्वांशी आपुलकीने राहते
दुखवत नाही मन कुणाचे इतके छान नाते जी जपते
ती पत्नी असते ...
प्रेम सून, मायाळू आई म्हणून घरात शोभते
मनमिळावू, अन्नपूर्णा, सर्वगुणसंपन्न अशा अनेक रूपांनी जी प्रसिद्ध राहते
ती पत्नी असते...
माहेरी जात असताना जेव्हा घरात कोणालाही करमेणासे होते
ती येते तेव्हा "घराला घरपण" आल्याचे जाणवते
ती पत्नी असते...
सहज आपलेसे करते सासरच्या मंडळीला
समरस होते सोडून माहेरच्या माणसांना
सगळ्यांच्या मनासारखे,सर्वांच्या आवडीचे करण्यासाठी
जी सतत धडपड करते ती पत्नी असते..
तिच्या आगमनाने याला जीवनात मिळतो सहारा
तिच्यामुळे चालतो सुरळीत संसाराचा गाडा
आपले कुटुंब आता आपल्यासाठी सर्वस्व मानून
सर्व जबाबदारी, कर्तव्य जी व्यवस्थितरीत्या पार पडते
ती पत्नी असते...
आयुष्याला परिपूर्ण अर्थ देणारी
निस्वार्थ अशी ती सहधर्मचारिणी
पतिव्रता, सेवामयी,
सुंदर, सुशील अर्धांगिनी
म्हणून जी ओळखली जाते
ती पत्नी असते...
