पतंग
पतंग
1 min
352
लाल पिवळा जांभळा
कागदाचे निवडू रंग
मस्त मस्त रंगीबेरंगी
बनवु आपण पतंग
बांबूच्या घेवू काठ्या
पतंग बनवू खूप मस्त
दोस्तांनी बनवलेला
पतंग असे खूप स्वस्त
मांजा चक्री घेवू हाती
पतंग सोडू आकाशी
वाऱ्याच्या झोतावरती
कागदाचा उडवु पक्षी
लांब लचक शेपटीचा
खुलून दिसेल नखरा
इकडून तिकडे सारख्या
पतंगराव मारेल चकरा
मजामस्तीमध्ये कोणी
पतंग आमचा काटेल
झाडात अडकून कोठे
पतंगोबा कधी फाटेल
पतंगाला उडविण्यात
दोस्तांनो होवूया दंग
वाऱ्याच्या तालावरती
बघा नाचे कसा पतंग!!!!
