पतीराज
पतीराज
पतीराज नावाचं नातं कोणालाच लवकर समजत नाही।
रागावतो ,चीड चीड करतो म्हणून त्याच मन कोणालाच उमजत नाही।
दिवसभर बाहेर काम करून घरी थकून येतो।
बायको मुलांना पाहून सगळं कामच ओझ विसरून जातो।
उन्हात स्वतः हिंडतो पण बायको मुलांना सावलीच छत देतो।
किती ही राग आला तरी राग सगळा गिळून घेतो।
कोण आहे माझ्याशिवाय तिला? म्हणून परत समजून घेतो।
स्पर्धेच्या युगात चोहीकडे असते गर्दी आणि त्रासलेले मन।
पण आपेक्षांच्या ओझ्यामुळे कमवावे लागतेच धन।
दिवसभराची धावपळ आणि कामाची घाई।
घरात आल्यावर चीड चीड करायला असते मुलांची आई।
कष्ट माझे पगार तुझा असे कधीही म्हनत नाही।
माहित असते घरात बायकोचे सारखे काम चालूच असते काही न काही।
संसाराचा गाडा दोन चाकावर चालतो।
त्यासाठी दोघांना समतोल साधवाच लागतो।
त्यासाठी दोघांना समतोल साधवाच लागतो।
