पतीदेवास पत्र
पतीदेवास पत्र
1 min
376
नाही म्हणत तुला,
आकाशातील चंद्र आणून दे।
पण येतांना घरी,
गालात थोडे हसू असू दे।।
नकोस म्हणू मला,
आवडते तू जास्त सर्वात।
पण प्रेमाची एक नजर,
असू दे तुझ्या डोळ्यात।।
नाही म्हणत तुला,
जेवायला बाहेर जाऊ आपण।
पण एकदा तरी,
सुखाने दोन घास खाऊ आपण।।
नाही म्हणत तुला,
कामात मदत कर माझ्या।
पण किती करतेस ग,
तोंडून तरी येऊ दे तुझ्या।।
नाही म्हणत तुला,
हातात हात गुंफूण जाऊ जरा।
पण दोन पावले तरी,
संगतीने चालू जरा।।
नाही म्हणत तुला,
नावाने साद घालीत जा।
पण अग, ऐकलस का?
मधून मधून म्हणत जा।।
जीवन असेच असते,
नेहमी भाग दौड करा।
थकल्यावर क्षणभर तरी,
जवळ बस जरा।।
