पसायदानाधारित चाराक्षरी
पसायदानाधारित चाराक्षरी
1 min
320
ज्ञानदेव
गाई गान
प्रसादाचे
मागी दान
' हे ईश्वरा
दे सुमति
नष्ट करी
ती कुमति'
'वैरभाव
ठेव दुरी
प्रेमभाव
नांदो उरी'
'कर नाश
अज्ञानाचा
पापरूपी
अंधाराचा'
'संतसंग
घडो देवा
सद्गुणांचा
लाभो ठेवा'
'संतजन
कल्पतरु
अमृताचे
ते सागरु'
'सुजनहो
ठेवा ध्यानी
त्यांसी जाणा
चिंतामणी'
अज्ञानी मी
मी अजाण
भगवंता
दे रे ज्ञान'
'व्हावे जग
सुखमय
नको कोणी
दुःखमय'
प्रसादाचे
द्यावे दान
अध्यायाचे
समापन.
