STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

प्रयत्न

प्रयत्न

1 min
11.8K

आवड झाली आभाळाची, संकटाच्या पाऊस धारा.

तळमळ झाली मस्तकी, प्रयत्नांचा वाहू लागला वारा.


प्रयत्न तो प्रत्येक नवीन, काहीतरी शिकवीत होता.

अपयशाच्या प्रवासाला, आणखीन हिनवीत होता.


हिणवन्याने सगळ्यांच्या, तुटणार कधीच नव्हतो.

शांत ऊभा राहून, गर्दीत आपलेच चेहरे पाहतो.


पाहिले ते खुप काही, अजून बहोत बाकी आहे.

बदलण्यास सगळे चित्र, संघर्ष यातना पाहे.


यातना त्या कठिन, रस्ता अडवू पहात होत्या.

ओढ आवडीची एवढी, प्रयत्न थांबू देत नव्हत्या.


Rate this content
Log in