STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

पर्यावरण

पर्यावरण

1 min
530

पर्यावरण


जिकडे पाहावे तिकडे

चाललाय पर्यावरणाचा ह्रास

झाले इतके प्रदूषण की

मिळेना मोकळा श्वास


सारे झाले भोगवादी

तोडली त्यांनी झाडे

कसे चालेल सांगा आता

मानवाचे जीवन गाडे


जीवन ज्याचे नाव

ते पाणी विकत मिळते

जपून आता वापरावे

हे सांगूनही कुठे कळते


जिला म्हणतात माता

ती होती किती सुपीक

वापरून रासायनिक खते

ती देखील केली नापीक


नाही वाचवले पर्यावरण

निश्चित आहे आपला अंत

कळते सर्वांना आहे हे

तरीदेखील नाही खंत


Rate this content
Log in