पर्यावरण समतोल
पर्यावरण समतोल
1 min
237
चला चला चला रे
झाडे लावू झाडे जगवू
पर्यावरण वाचवू या रे ।।ध्रु।।
एक झाड लावा प्रत्येकाने
त्याला जगवा हो प्रेमाने
खत ,पाणी घालवून वाढवू या रे।।१।।
चला चला....
झाडांचे मोल खूपच जीवनात
देण्याची शिकवण देती आयुष्यात
सेवेचे व्रत आपण घेऊ या रे।।२।।
चला चला...
झाडांशिवाय जीवांना पर्याय नाही.
आँक्सिजन त्यांच्याशिवाय मिळणार नाही
झाडांची महती जाणून घेऊ या रे।।३।।
चला चला...
पर्यावरण संतुलन खूपच आवश्यक
झाडे जगवून आपण होवून रक्षक
पर्यावरण समतोल राखवू या रे।।४।।
चला चला....
