STORYMIRROR

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

प्रवासात सावधान

प्रवासात सावधान

1 min
290

प्रवास गोड, आंबट

प्रवास कडवट, खारट

प्रवाशी चालले गाडीत

जीवन चालकाच्या हातात

कुणाची जमते गट्टी

कुणी असतेच हट्टी

बस अथवा रेल्वेत

एखादा नमुना असतोच

कधी होते करमणूक

कधी होते फसवणूक

कुणी झोपती, बोलती

कुणी हसती, भांडती

कुणास बस लागती

कुणी खात सुटती

बस थांब्यावर येती

फेरीवाले विक्री करती

फेरीवाले सेवा पुरवती

उदर निर्वाह करती

जीवन प्रवास तो करती

रेल्वेत जीवन दिसते

कष्टाची चाकरी दिसते

रेल्वेत चढण्यास धावती

गर्दीची शर्यत लागती

बसायला जागा मिळती

जसे ध्येय पुरे होती

फेरीवाले रेल्वेत येती

अंध अपंग काम करी

कुणी भजन करी

कुणी मुलं कसरती

तृतीयपंथी पैसे मागती

भला हो तेरा बोलती

कुणी चहा, रस,कुल्फीवाला

लाहया, फुटाणे,शेंगावाला

समोसा,भजी, कचोरीवाला

प्रवास यांचा रोजच पोटाचा

कुणाची मुलं हरवतात

कुणाची मुलं पळवतात

तेव्हा हतबल होतं मन

कसा कधी भेटतो दुर्जन

कसा कधी भेटतो सज्जन

व्हावं आपण सावधान

आपला पायी प्रवास दिंडीचा

असा निसर्गाच्या सोबतीचा

कसं हे निसर्गाचं सुंदर रूप

सतत पहावं निरखून खुप

प्रवासात चोर चोरतो सारं

तेव्हा अनुभव येतो फार

कळते जीवानाचे सारे सार

परिस्थितीशी घ्यावं जुळतं खरं

माणूस भेटतो कुणीतरी उदार

तोच देवमाणूस करतो उध्दार


Rate this content
Log in