प्रवास
प्रवास
प्रवास कधी संपत नसतो मजल दर मजल वाढत जातो,
एकटे चालताना सगळा गोंधळ शांततेत विरून जातो.
सुरवात केली तेव्हा सगळ कंटाळवाण वाटत,
मध्यंतर असा जीव लावतो मग सगळ पटत.
विसाव्या साठी थांबा सुरू होतात मुक्काम,
शेवट गाठण्या एकदाचा घाई करतो मुद्दाम.
आता थकलो तरी जाणवत नाही तंद्रीत असतो स्वतःच्या,
एवढी सवय झाली प्रवासाची ह्या तुझ्या मताचा.
सरते शेवटी संपला असे भासवतो,
पुन्हा पुढचा मार्ग कुठे तरी जाणवतो.
पुन्हा एकदा कंटाळवाणी सुरवात करतो,
कारण प्रवास कधीच सम्पत नसतो.
