प्रवास
प्रवास
1 min
185
वाकळ्या त्या वळणावरती
अबोल सुंदर झाड
त्या सावलीतून वेगे जाणे
आवडे मजला फार
अथांग पसरली हिरवी झाडे
गडप त्यात दुपार
धरे वरचा स्वर्ग भासते
नटली सृष्टी अपार
समोर बघता उंच टेकडी
रस्ता होई पसार
दचकून काळीज धक्कन होई
लगेच उघडी दार
कुठे आभाळ धबधब सांडे
खिडकीतून येई तुषार
झुकझुक करती आगीन गाडी
धावत असे लडीवाळ
राघु मैना जवळ बैसले
जुळवीत गेले तार
स्वप्ना मधला प्रवास संपला
पुढ्यात घरची नार
