प्रवास
प्रवास
आगगाडीचा प्रवास
खरच किती छान ।
झाडे दिसते सुंदर
हिरवेगार दिसते रान ।
मोठया मोठ्या त्या
पर्वताच्या रांगा ।
किती छान निसर्गचित्र
कोणी तयार केले सांगा ।
पांढरे पांढरे धुके जसे
कापसारखे पिंजलेले।
पक्षी गाती मंजुळ गाणी
पानावर दवबिंदू मोतीसमान साचलेले ।
असे वाटते आता ढग
उतरले की काय खाली।
हात लावता येईल त्याला
पण ते इतके सोपे नाही।
मोर नाचताना तेवढ्यात
मला जवळून दिसला।
पिसारा फुलवीत तो
थुई थुई नाचला।
असा आगगाडीचा प्रवास
मला खूप सुंदर वाटला।
सगळा निसर्गरम्य प्रवास तो
मी माझ्या मनात साठवून घेतला।
