प्रवास
प्रवास
रम्य अशा स्वर्गाहुनी
प्रवास आईच्या गर्भातुनी
पहिले पाऊल तिच्या अंगणी
आकाशी ती नभोचांदणी
बालपणाचा मोहक रंग
आनंदाचे डोही तरंग
बाबांची ती राजस लेक
त्यांचे सारे तिच जग
माहेराचं सुंदर घरटं
सोडून टाकिले पाऊल पुढचं
चिमणी झाली अशी परकी
घरटं सोडून गेली दूर की
सासर-माहेर जोडणारा
आज असा ती पूल जाहली
आईची ती लेक होती
लेकीची ती आई झाली
नात्यांच्या त्या वळणावरुनी
प्रवास चाले तिचा निरंतर
सा-यांसाठी झिजुनी तरीही
तिच्या सुखाचा शेवट नंबर
संघर्षाला तोंड देऊनी
आस्तित्व राखण्या झगडते
ध्येय ठेवूनी उच्च अस्मानी
कुठे ही ना कमी ती पडते
स्रिचा सारा जन्मच खास
तिचे दुजे नाव साहस
कठीण तिचा सारा प्रवास
कळेल येता स्री जन्मास
