प्रवास
प्रवास
1 min
354
हा एकट्यानेच आहे
पूर्ण करायचा
या प्रवासात जीवनाच्या
कोणी ना शेवटाला जायचा
मग का करायची तक्रार
का रडायचे पाहुनिया खाचखळगे
फक्त धैर्यशील रहायचे लक्षवेधी रहायचे
आणि कसबीने टाळायचे खाचखळगे
या प्रवासातून साधायचा असतो
उत्कर्ष स्वतःचा आणि समाजाचा
हा अनुभवाचा प्रवासच ठरतो
मार्ग दाखवणारा दीपस्तंभ समाजाचा
कुणाकुणाला अगदीच कंटाळा
येतो या वाटेवर चालतांना
तोल ढासळतो आणि आघात होतात
या जीवनाच्या प्रवासात
या अश्या वेळी मात्र
तों निर्विकार उभा मिळतो
योग्य मार्ग दाखवण्यासाठी
बनुनि मैलाचा एक अढळ दगड
