Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prasad Kulkarni

Others

2.8  

Prasad Kulkarni

Others

प्रवास

प्रवास

1 min
168

सकाळची आठ सत्तावीसची गाडी

तुडुंब भरून आली फलाटावर

गुळाच्या मुंगळ्यासारखी माणसं चिकटलेली

आत बाहेर आणि खिडकीवर

एका हाताने एका पायाने झोंबून

गाडीशी अटॅच्ड झालेली

केवळ इच्छाशक्तीच्या बळावर पुढच्या -

स्टेशनपर्यंत तग धरून राहिलेली

उन्हाळ्यात घामाने हात सटकत असतो

पावसाळ्यात सपकारा पाण्याचा , तोंडावर बसतो

यातच एखाद्याचा डोळा , कुणाच्या पाकिटावर असतो

तर दुसरीकडे भजनाला रंग चढलेला दिसतो

जलद लोकल नावाची ,अंधश्रद्धा असते

दोन स्थानकांमध्ये गाडी ,थांबून रहाते

चढत जातात चिकटत जातात , गर्दी इतकी होते

घुसमटून जीव , अक्षरशः जाण्याची वेळ येते

तरीही प्रत्येकजण हसत असतो , बोलत असतो

गोष्टी सुख दुःखाच्या आपसात , वाटताना दिसतो

साऱ्यांनाच मुंबईचा चाकरमानी शूर वाटतो

सांगा मला , त्याच्याकडे पर्याय काय असतो.

Rate this content
Log in