प्रवास
प्रवास
1 min
193
जीवनाच्या या प्रवासात
आहे खडतर वाटा
क्षणोक्षणी भेडसावतात
सुख दुःखाच्या लाटा.......
प्रवास फक्त एक आहे
समस्यांचे डोंगर मोठे
सोडवताना प्रश्न अनेक
आयुष्य पडते छोटे........
खरे काय खोटे काय ?
आजवर कुणा ना कळले
अचूक मार्ग शोधण्यात
अर्धे जीवन सरले...........
काटे जास्त असले तरी
प्रवास कुणा ना चुकले?
ज्यांनी रोवली घट्ट पाय
तेच जीवन स्पर्धेत टिकले......
अडचणीवर करत मात
सुंदर जीवन बघायचे आहे
प्रवासात या न हरता
आनंदाने जगायचे आहे.......
म्हणून जीवन आहे
एकाच नाण्याच्या दोन बाजू
सुख आणि दुःखाची
किंमत हसत-हसत मोजू.....
