प्रवास
प्रवास
1 min
233
आगगाडीच्या प्रवासाच
काय सांगू मी वर्णन
खिडकीच्या काचेतून
बाहेर रमलेल माझं मन।
डोंगर दऱ्या खोऱ्या
आणि सोबत पळणारी झाडे
मनमोहुन टाकणारे दृश्य
निसर्गाची किमया किती सुंदर गडे
डोंगरावरचे धुके
कापसारखे पिंजलेले
पानावरचे दवबिंदू
सुंदर मोतीसमान दिसलेले।
उंच उंच पर्वत रांगा
भासे आभाळ त्याला टेकलेले
घेतले डोळ्यात भरून सगळे
निसर्गदृश्य मी बघितलेले।
