प्रवास योद्धा ते रुग्णाचा
प्रवास योद्धा ते रुग्णाचा
1 min
236
करे रुग्णांची सेवा
मनोभावनाने सर्वांचे,
मिळाले बक्षीस तिला
आज कोविड युद्धाचे.
ना कशाची खंत बाळगे
ना कधी अभिमान,
धैर्याने सामोरे जाई
पोर माझी गुणवान.
आयुष्य असले खडतर
तरी आत्मविश्वासाने जगे,
वाचवण्यास सर्वांचे प्राण
पुढाकार घेण्यास भागे.
रोज हसतमुख असणारी
एकदा उदास झाली,
आई तुला पहायचं गं
म्हणून विवळून रडली.
कोवीड योद्धा आज
कोवीड रुग्ण झाली,
देवा वाचव लेकरास
आई देवळात धावली.
का कोणास ठाऊक पण
विपरीत सारे घडले,
लोकांना आपलेसे करणारी
देवाने तिलाच हिरावून नेले.
विनंती आज सर्वांना
हात जोडूनी आई बोले,
रहा सुरक्षित घरात सारे
काळ सर्वास बाहेर बोलावे.
