STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

प्रत्यक्ष

प्रत्यक्ष

1 min
194

पाहिलं खूप वेळा होत, प्रत्यक्षात भेटलो आज.

बोलायचे काय कळत नव्हते, मोडून पडला शब्दमाज.


विचार भरपूर केले तूझे, त्या पेक्षा वेगळी वाटलीस.

वाईट काहीच नव्हते, खूपच चांगली भासलीस.



असो तरीही खूप बोललो, काही बोलायच राहील.

तूझ्या मधल्या तुला, आज जवळून पहिलं.



प्रखरतेन जाणवलं, खरच वेळ बदललाय.

आपन जरी तेच असलो, काळ मात्र सरसावलाय.



नशिबाने आपल्या प्रत्येक वेळी, समोर येऊ किंवा आणू.

प्रत्येक भेटीत थोडे थोडे का होईना, नवीन काहीतरी जाणू.



या आधी कधीही लिहिताना, कधीच नव्हतो मी दक्ष.

आज लिहिण्यास कारन नक्कीच दिले, भेटलीस जेव्हा प्रत्यक्ष.


Rate this content
Log in