प्रत्येकाला असं वाटतं
प्रत्येकाला असं वाटतं
प्रत्येकाला असं वाटतं
माझ्याशी सर्वांनी बोलावं
माझ्याशी गप्पा माराव
तुमच्यात मिसळून जावं
असंच आयुष्य हसतखेळत रहावं.....
काही असे असतात त्यांना
एखाद्याशी मैत्रीचं नातं जोडलं
की सोडून जाऊ नाही वाटतं
सारखं बोलत राहूं वाटतं
असंच दिवस जात राहतं....
काही असे धोसरा काढतात
की कधी त्यांची भेट होईल
कधी माझं मन मोकळं करील
असं होतं ते आठवण काडून ही
ते भेटत नसतात....
कधी कधी अस होतं त्यांना
भेटायला गेलो की ते ह्या
जगातून निरोप घेऊन गेलेले
असतात ते सुद्धा आठवतात
कारण त्यानी आपल्या साठी
काही तरी केलेलं असतं
तेच लोकं आपल्याला
हवे असतात.....
काही इतके बोलकी असतात
त्यांच्यातच वेळ घालवू वाटतं
त्यांच्या घरी जाऊन बसू वाटतं
मनांत असणारे सारे प्रश्न मांडू
असं मनाला भासत असतं.....
