परतुनी तुला भेटणार नाही
परतुनी तुला भेटणार नाही
परतुनी तुला भेटणार नाही...
गेला काळ तो परतणार नाही
परतुनी तुला मी भेटणार नाही
क्षण पार्याचे हाती गवसणार नाही
साथ क्षितिजाची लाभणार नाही
सचित अचित तस काही नाही
अक्षयी अस काही उरणार नाही
मनात आता काही साचत नाही
परतुनी तुला मी भेटणार नाही
दिल्या घेतल्या वाचनाची ती नांदी
चंद्र नभीचा कधी ढळणार नाही
चुकुनी जाहल्या ज्या गाठी भेटी
अंतरी ते कधी विसणार नाही
जगबदल माझ्याच अवतीभवती
मनाचे क्षितिज ते दिसणार नाही
आभासिक जग मी भुलणार नाही
एकदा बदलले पुन्हा बदलणार नाही
मनात आता काही साचत नाही
उरुनी भाव तो अंतरी जगत नाही
सोडूनी दिले पाश ते मी स्वप्नांचे
बदलावस आता वाटत नाही...
