परतफेड
परतफेड
1 min
632
उपकाराच्या ओझ्याची
परतफेड करता येत नाही
लावा सहस्त्र हात त्याला
जमिनीवर ठेवता येत नाही
संकटसमयी जो आला धावून
विसरता त्याला येत नाही
ऋणानुबंधाच्या नात्याला
बोट लावता येत नाही
स्वार्थाच्या बाजारात
कोणी कोणाला मोजत नाही
प्रामाणिक पणाच्या साथीला
दाखल्याची गरज नाही
कातडीचे जोडे केले तरी
जन्मदात्याचे उपकार फिटत नाही
दिला जिने नशिबाला आकार
पाऊलखुणा मोडता येत नाही
परदुःखाचे जो वाहे ओझे
निर्मळ करुणामयी हृदय ज्याचे
मदतीस धावून येत असे
परतफेड कशी करावी तयाचे
