प्रतिमा!
प्रतिमा!

1 min

3K
मी दुष्ट नाही
नव्हतो कधी
प्रेम केले सदा
या दुनियेवरती
कोण जाणे कशी
झाली दुष्कीर्ती
दुष्ट मी खाष्ट मी
सर्वांमध्ये!
कटू अनुभव
आले जीवनी
म्हणूनी असेन
कदाचित रुष्ट मी!
सावरले ना कोणी
समजावले ना
जगत राहीलो मी
दुष्ट म्हणूनी!