प्रतिमा
प्रतिमा
1 min
336
अजुन आठवे,
केशभार,
कटी,केश लागती,
तशीच आठवे,
नासिका,जशी,
चाफेकळी.
अजुन आठवे,
गालावर खळी,
जशीच्या तशी,
शुभ्र दात जसे,
तूच पोर्णिमा होती.
अजुन आठवे,
नयन तुझे,
मृग भुलला पहाता,
जशी तू, एक
मृगनयनी होती.
अजुन आठवे,
चेहरा लाल तुझा,
गुलाबी पाकळी,
जशी पुर्वेला,
तांबडफुटी झाली.
अजुन आठवे,
पाय तुझे,
सरळ बोटावर,
जसे केळीखूंट,
ऊभे.
क्षण क्षण,
जाई पूढे,
जा त्यास,म्हणावे,
मी ठेवली ती,
प्रतिमा जशीच्या,
तशी.
आता ना तुझे,
भय मला,
काळा, तुझे जाणे,
जाशील किती पूढे,
करशील किती विकृती,
मी ठेवली हृदयी,
माझ्या प्रतिमा,
जशीच्या तशी.
