प्रतिक्षा
प्रतिक्षा
1 min
236
ग्रीष्माच्या दाहकते सारखा
तुझा विरह...
अंतरंग जाळणारा!
शिशिरातल्या पानगळी सारखी
तुझी प्रतीक्षा...
एकेका क्षणाने झुरवणारी!
वसंताच्या नव पालवी सारखे
तुझे आगमन...
पानागणिक फुलवणारे!
आणि
कोसळणाऱ्या श्रावणसरी सारखा
तुझा सहवास ...
मनाला सुखावणारा !
अंतर्मन ओलावणारा !!
