STORYMIRROR

Raghu Deshpande

Others

4  

Raghu Deshpande

Others

प्रतिबिंब....!!

प्रतिबिंब....!!

1 min
206

आता अंधार बरा वाटतो

जेव्हा माझें मी प्रतिबिंब पाहतो.. 


आरशाला ही कळले नाही

हा असें का वागतो?

गोरे गोमटे रुप साजरें

मग का बरे पावडर लावतो..?


इकडून तिकडून येता जाता

मला पाहतो गाली हसतो

डोळ्यांचे कधी करून इशारें

पुढे जातो नि मागे येतो....!


रुप साजरे विचार वाईट

विचारास कोण पुसतो..?

देखण्या रूपाच्या जोरावर

रोज किती जणा फसवतो...!


चेहरे अनेक भोळेभाबडे

वेळप्रसंगी मी बदलतो

या बोटाचे त्या बोटावर

सराईत पणे असे करतो...!


विविध छटा माणसांच्या

एकाचवेळी वेळी मी रंगवतो

खरे न माझें रूप कुणाला

सहजासहजी मी दाखवतो...!


जे असतं ते दिसतं नाही

जे नसतं ते मी वठवतो

प्रामाणिक हा वेडा आरसा

जे दिसत तेच खरं मानतो...!


जीवनभर अशी प्रतारणा

मीच माझी करीत असतों

वय झालें मग सगळे गेले

आता मला कोण पुसतों..??


Rate this content
Log in