प्रतिबिंब
प्रतिबिंब
1 min
241
प्रतिबिंब आरशातले मागे ठेवून गेलास
- का?जाताना असा आभास देऊनी गेलास.रंगवली स्वप्ने किती मांडला डाव कसा विस्कटून गेलास.
- तू आभाळाला माझ्य तडा देऊन गेलास .बिनधास्त जगणं ,बेबंद तरीही.न्हवते कधीच दुःख गिळूनही हसावे कसे हे तूच शिकवून गेलास
- सार ,सार..आठवतंय आता ऊसने दिलासे तुझे ते .खिसे रीकामे जरी स्वप्नांनी भरलेले ते .आस उद्याची आज धरूनी कसे जगावे सांगणारी. सारी मुशाफिरी ओंजळीत साठवून गेलास .
- दाटला हुंदका दडवायचे कसब .वाटताना सुखे वेचत दुःख भरुन झोळीत चालणयाचे कसब ही तुच बोट धरून सावरीत गेलास.
- किति जगावे याचे न मोल .अनमोल करावे क्षण आले जे वाटयाला,भलेबुरे,जे अनुभव. दयावेच वाटे कुणा,तर भले देऊनी सुखी करावे जनाला हे शिकवुनि गेलास.
- अल्पायुषयातही तुझ्या काती शिकवून तू गेलास लहान होऊनी मोठे बळ देऊनी गेलास.
- लिहीण्या बोलणयास,ठिक आहे रे सारे वास्तव तू आता नाहीस हेच आहे.स्वीकारण्यास सत्य धैर्य ते द्याया तरी पुन्हा फक्त एकदाच परतून येशील का रे?
