प्रतिबिंब सुंदर मनाचे
प्रतिबिंब सुंदर मनाचे
नसावे विचार अविचारी कधी
कधी नसावे वाईट कर्म माणसाचे
कारण इथल्या प्रत्येक क्षणात
दिसते आपल्या प्रतिबिंब सुंदर मनाचे...
प्रेम करावे सदैव जणांवर
घ्यावेही आपण प्रेम कैक जणांचे
कारण इथल्या मनामनात
दिसते आपल्या प्रतिबिंब सुंदर मनाचे...
नसले अर्पण सर्वस्व जरी आपले
तरी आपणच व्हावे इथल्या सर्वांचे
कारण इथल्या कणाकणात
दिसते आपल्या प्रतिबिंब सुंदर मनाचे...
हसुन रहावे हसवत जावे
नाही लागत इथे कधी पैसे हसण्याचे
कारण इथल्या प्रत्येक ओठात
दिसते आपल्या प्रतिबिंब सुंदर मनाचे...
हेच आपले जगणे असते
असुनही दुःख सारे लपवून जगण्याचे
कारण इथल्या सहवासात आपल्या
दिसते आपल्या प्रतिबिंब सुंदर मनाचे...
