प्रसन्न झाली आज प्रभात
प्रसन्न झाली आज प्रभात
1 min
152
आभास चांदण्याचे मुक्त झाल्या तारका
पायवाट ही धूसर धूसर धुंद
झाली सारी वसुंधरा
लपेटून दवबिंदूंनी व्यापल्या दाही दिशा
सोनेरी किरणांचे नक्षीकाम जणू उजळावे
गाभाऱ्यातील दिव्यांच्या प्रकाशात
रमणीय आणि किमयागार
पहाट शृंगारली आज तेजोमय किरणात
भाद्रपद शुद्ध तिथी पंचमीचा
सोनेरी दिवस उजाडला..
प्रभूंच्या भजन-पूजाने
प्रसन्न झाली आज प्रभात..
