STORYMIRROR

Sharad Kawathekar

Others

3  

Sharad Kawathekar

Others

प्रश्न

प्रश्न

1 min
315

अनेक अवघड प्रश्न 

अनेक फसवी प्रश्न 

आणि अवघड फसव्या प्रश्नांच्या उत्तरात

असतो एक सुप्त विवेक 

त्या सुप्त विवेकांत न् सभ्यतेत

दडलेला असतो एक उद्रेक

भास - आभासात

फसव्या रूपात, फसव्या व्याखेत

ढोबळ न् मोघम जगताना

दगडी मुर्तीनां आणि रंगीबेरंगी झेंड्यांना

आम्हीच नवनवीन अर्थ लावतो 

आणि

त्यांच अर्थानी पुन्हा प्रश्न उभे केलेत

अधूनमधून एखादा झंझावात येतो 

आणि तितक्याच आवेगानं तो विझूनही जातो 

या सगळ्यात एक अस्थिरतेचा धागा 

मात्र खोलवर रूतत जातो आणि 

काळजाच्या कपारीतली श्वापद

मोकळी होत जातात न्

अवघड प्रश्न आणखीनच अवघड होतं जातात 


Rate this content
Log in