प्रश्न
प्रश्न
1 min
173
अंधाराच्या गर्द पाशात
अडकून पडलेली असतात
काही प्रश्न
धड़पडत राहतात,
उत्तराच्या त्या एका
किरणा साठी....
चाचपडतात....
शोधतात अवती-भवती....
भेटतात मग प्रश्नांनाच प्रश्न...
पण मिळत नाही त्यांना
दोन शब्दांचे ही
समाधान कुठे.....
नाहीच मिळत आपुलकीचा
ओलावा कुठे.....
तळमळत राहतात ते
पाण्या वाचून
मासोळी सारखे.....
कुढ़त राहतात......
सलत राहतात.....
आणि घेतात काही
शेवटचा श्वास
त्या अंधाराच्या
गर्द पाशात
उत्तराशिवायच....
