STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

प्रश्न ( सहाक्षरी )

प्रश्न ( सहाक्षरी )

1 min
12.1K

पृथ्वीवर असे

मानव उपरा

सुरक्षित कोठे 

कोणता कोपरा ?


ती सूक्ष्मजीवांची 

येथे मांदियाळी 

तिच संपवेल

कधी कोणे काळी !


कितीतरी वेळा 

आली महामारी 

मानवी अस्तित्व 

तरी तग धरी


प्रत्येक जीवास

हक्क जगण्याचा 

उगवता सूर्य

पुन्हा पाहण्याचा


अस्तित्व लढाई 

झाली आहे सुरु

एकजूट होवू

मात आता करू


प्रश्न भेडसावे

जग हे कुणाचे ?

उत्तर हे कोणी

आता शोधायाचे ?



साहित्याला गुण द्या
लॉग इन