STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

4  

Pratibha Bilgi

Others

प्रश्न आजच्या पिढीचे

प्रश्न आजच्या पिढीचे

1 min
300

समाजाच्या उत्थानात, आहे ज्याचा वाटा

तो आहे, आजच्या काळातला कर्तृत्ववान युवा


त्याच्यासमोर आहेत, अनेकानेक यक्ष प्रश्न 

कसा करावा संघर्ष अन् कशी पेलावीत आव्हानं 


भारतीय आदर्शवाद, पडत चाललाय मागे

देशाबद्दल बांधिलकी, संपण्याच्या मार्गावर आहे 


नैतिकतेवर अनैतिकतेचा, पारा वरचढ जाहला 

जयाला- त्याला, पाश्चात्य संस्कृतीचा मोह जडला


विसंवादाने बळकावली, संवादाची जागा

आजचा तरुण, सोशल मीडियाच्या मागे लागला


व्यसनाच्या धुंदीत , हा युवा वर्ग अहंकारी बनला

गमावून व्यवहारज्ञान, स्वतःची क्षमताही विसरला 


थोडीशी जागरूकता, सोबत तंत्रज्ञानाचे शिक्षण

बदलवू शकते या पिढीचा, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन


आजच्या पिढीला आहे, उज्वल भविष्याची कल्पना

फक्त समजायला हवी, यांना युवाशक्तीची सामर्थ्यता 


Rate this content
Log in