पर्स
पर्स
पूर्वी बायका कासोटा नेसत त्याला असे बटवा, बटव्यात असायच्या विविध वस्तू आणि औषध
काळाच्या ओघात कसोटा गेला, कसोट्यासह बटवा ही
प्रत्येकच स्त्री जवळ दिसू लागली पर्स... मग काय...👛👝
पर्ससोबत स्त्रियांची ओळख
झाली मग खूप छान
विविध आकारात अन् रंगात मिळू लागल्या बाजारात आता तर हिच्या शिवाय हालायचे नाही कुणाचेही पान💃
लहान मुली, बायका,
सार्यांनाच आवडे हिचे सुंदर
अन् विविध रूप
दुकान, असो बाजार मोठा, खरेदी करण्यास नेहमीच अतिशय उपयुक्त
हवाहवासा वाटतो स्त्रियांना हिचा सहवास
मँचिग असली तर आनंद मिळतो काही खास
सिनेमाच टिकित असो वा हॉटेल रेस्टॉरंटच कुठलेही बिल
अगदी व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवल्या जात पर्समध्ये, त्यावरील शाई जरी उडून गेली तरी चित्र दिसतं रंगीन...
जादूचा पिटाराच म्हणावा सेफ्टी पिन , रबर, इ. बस एकच...काही वेळा जे पाहिजे ते वेळेवर नाही मिळत
आत्ताच तर ठेवलं... हरवलं का... म्हणत...
सुरू होते मग पळापळ....
त्यावर मग सर्व गप्पागोष्टी, उडालेली तारांबळ अन् झालेली गंमत किती....
आवश्यकच आहे स्त्रियांना हिची संगत...
सर्व महिलांसाठी, कार्य प्रसंगी
अतिशय आवश्यक ही ठरते
वेशभूषेचे सह पर्स ही नेहमी सर्वांच आकर्षण ठरते
खरेदी केलेली वस्तू असो वा मोबाईल
पर्समध्ये नक्कीच बसते, त्यामधील जपून ठेवलेले पैसे, आहे की अजून...म्हणून
मनाला वेगळाच आनंद आणि समाधान देते ....हो न....😊
