STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

3  

गोविंद ठोंबरे

Others

प्रपंच विठ्ठल

प्रपंच विठ्ठल

1 min
277

माय विठ्ठल विठ्ठल 

नाद घुमतो मंदिरी ।

ओढ भेटीची माऊली

भूक दर्शना उदरी।।


बाप विठुराया तूच

मला आषाढी भावली।

गुण किती सांगू तुझे

मना भक्ती ही दाटली।।


भाऊ माझा विठुराया

तूझे आलिंगन हवे।

घोडा पालखीचे रिंगण

मला न्यायला तू यावे।।


देवा दान काय आता

कसे जगी मी मिरवू।

तुलसी माला रे जपुनि

सांग पांग कसे फेडू।।


तुझ्या पावलांचे माय

मला स्मरण रहावे। 

आषाढी-कार्तिकीला 

सारे भान हरवावे।।


आता धावून तू राया

माझ्या प्रपंचात यावा।

माझ्या तहानुल्या डोळी

सारा विठ्ठल दिसावा।।


Rate this content
Log in